मावळराष्ट्रीयसामाजिक

टाकवेतील लक्ष्मीनगर परिसरात मुलभूत सुविधाची वणवण नागरिकांकडून आंदोलनचा इशारा

गटर,रस्ता,पाणी वेळेवर येत नसल्याने नागरीक त्रस्त

Spread the love

 

टाकवे बुद्रुक – मागील पाच वर्षांपासून टाकवेतील लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील ७० पेक्षा अधिक कुटुंबातील नागरीक त्रस्त आहेत याबाबत नुकतेच लक्ष्मीनगर परिसरातील युवकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन निवेदन दिले आहे

निवेदन मांडण्यात आलेल्या प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे –

① पाण्याची सोय नसणे (पाणीपुरवठा) : सध्या चालू असलेल्या जुन्या, पाईपलाइन मधुन अत्यंत कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो तसेच काही पाइपलाइन सडलेल्या असल्याने दुषित णणी येत आहे. तसेच नवीन जलजीवन लाईन अद्यापही सुरु झाली नाही ती तात्काळ सुरु करण्यात यावी.

 

② गटार व्यवस्था नसणे : (ड्रेनेज सिस्टीम) : या परिसरात गटार व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर तुंबते. यामुळे सर्व दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात गटर साफ करावे नवीन गटर करावे.

③ रस्त्यांची सोय नसणे – लक्ष्मीनगर भागातील अंतर्गत रस्ते

पूर्णपणे खराब झालले आहेत. गेले कित्येक वर्ष याभागात रस्त्याची काहीच सोय नाही. तसेच लक्ष्मीनगर भागात येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्य रस्त्याचा प्रश्न वादविवादात मुळे प्रलंबित असून तो देखील वाद मिटवुन रस्ता करण्यात यावा अंतर्गत नवीन रस्ते करावे.

④ कचऱ्याचे व्यवस्थापन : या भागात कचरा टाकण्यासाठी जागोजागी कुंड्या उपलब्ध नाहीत कुंड्या उपलब्ध करून जागोजागी ठेवण्यात याव्यात.

येत्या महिन्याभरात काम न सुरू केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे सरपंच अविनाश असवले,माजी उपसरपंच संतु दगडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी भाजप जेष्ठ नेते काशिनाथ जाभुळकर,अमोल खुरसुले,सागर जाभुळकर, गणेश जाभुळकर,भास्कर जाभुळकर,दादाभाऊ माळी,विठ्ठल तुर्डे,आदीत्य तुर्डे, कृष्णा पवार, विनायक क्षिरसागर,रोहन थरकुडे, सुरेश तळावडे,खंडु जांभुळकर,साहील खुरसुले, दादाभाऊ जाभुळकर,आदी जण उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button