आंदर मावळातील रुग्णांसाठी दिलासा; टाकवे येथील एकविरा हॉस्पिटल मध्ये कॅशलेस उपचार सुविधा सुरू

टाकवे (ता. मावळ) : आंदर मावळ परिसरातील रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. टाकवे येथील एकविरा हॉस्पिटलमध्ये आता विविध नामांकित आरोग्य विमा कंपन्यांमार्फत कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये HDFC ERGO, TATA AIG, Aditya Birla Health Insurance तसेच Ericson Insurance TPA यांचा समावेश आहे.
या सुविधेमुळे रुग्णांना उपचाराच्या वेळी मोठी रक्कम तत्काळ भरण्याची गरज भासणार नाही. विमाधारक रुग्णांना कॅशलेस पद्धतीने उपचार मिळणार असल्याने आर्थिक ताण कमी होऊन उपचार प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना डॉ. सुनील औटी म्हणाले,
“ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना अनेकदा आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार घेता येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, तसेच त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होईल. एकविरा हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात आणखी विमा कंपन्यांचा समावेश करून ही सेवा अधिक व्यापक करण्याचा आमचा मानस आहे.”
आंदर मावळातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.



