निधन वार्ता
टाकवे गावचे माजी सरपंच भूषण असवले यांचे चुलते धोंडीबा असवले यांचे निधन

टाकवे बुद्रुक | प्रतिनिधी मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावचे माजी सरपंच भूषण असवले यांचे चुलते धोंडीबा गुणाजी असवले (वय ८६)यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने असवले कुटुंबीयांसह टाकवे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धोंडीबा गुणाजी असवले यांनी आपल्या साध्या, कष्टाळू वृत्तीने सर्वत्र परिचित होते त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हाँटेल व्यावसायिक रामभाऊ असवले व देविदास असवले यांचे वडील तर टाकवे गावचे माजी सरपंच भूषण असवले तसेच बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री महेंद्र असवले यांचे ते चुलते होत.
अंत्यविधी आज रात्री ८ वाजता नवीन स्मशानभूमी टाकवे बुद्रुक येथे होणार.



