निळशी येथील कै.श्रीमती बबाबाई रामचंद्र म्हसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली;मंगळवारी दशक्रिया विधी
.

मावळ – मावळ तालुक्यातील निळशी गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कै. श्रीमती बबाबाई रामचंद्र म्हसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने म्हसे परिवारासह संपूर्ण निळशी गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी अत्यंत हळहळ व्यक्त केली आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या.
कै. बबाबाई म्हसे या शांत, प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या महिला म्हणून परिसरात परिचित होत्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मायेची ऊब देत त्यांनी आयुष्यभर समाजात जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या निधनामुळे गावाने एक स्नेहाळ, संस्कारक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
त्यांच्या स्मरणार्थ सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. बाळासाहेब महाराज बायकर (विकळे) यांचे प्रवचनरूपी सेवा होणार असून, त्यानंतर सामुदायिक हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार दिनांक १९ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता ह.भ.प. गणेश महाराज जाधव (शिंदे) यांची प्रवचनरूपी सेवा होणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम वैकुंठ स्मशानभूमी, निळशी, ता. मावळ, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला असून, दशक्रिया विधीला उपस्थितीत राहावे असे आवाहन म्हसे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



