मावळ

वडेश्वर (मावळ) येथे आधार सेवा केंद्राचे लोकार्पण; नागरिकांच्या अडचणींना मिळणार दिलासा

Spread the love

वडेश्वर (ता. मावळ) : आंदर मावळ परिसरातील नागरिकांना आधार कार्ड संदर्भातील विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मावळचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पुढाकारातून वडेश्वर येथे नव्या आधार सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली असून, या केंद्राचे उद्घाटन नुकतेच शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख राजेश खांडभोर यांच्या हस्ते पार पडले.

या केंद्रामुळे आता आंदर मावळ परिसरातील नागरिकांना आधार नोंदणी, दुरुस्ती, अद्ययावत माहिती अशा सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून, शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. अनंत पावशे, आदर्श सरपंच श्री. शांताराम लष्करी, माजी सरपंच श्री. बबनराव हेमाडे, माजी चेअरमन श्री. छगनसेठ लष्करी, संजय गांधी निराधार समिती सदस्य श्री. शंकर हेमाडे, चेअरमन श्री. मधुकर तुपके, चेअरमन श्री. मारुतीराव खांडभोर, उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर जगताप, उपसरपंच श्री. शिवराम शिंदे, तसेच श्री. मारुती शिंदे, श्री. तानाजी शिंदे, सदस्य सौ. मनीषा दरेकर, माजी सरपंच सौ. संतोषी ताई खांडभोर, श्री. निलेश शिंदे, श्री. अनंता हेमाडे, अंगणवाडी अधिकारी भागवत मॅडम व श्री. विक्रम हेमाडे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. नव्या आधार केंद्रामुळे वडेश्वरसह आसपासच्या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button