मावळ

मंथन राज्यस्तरीय परीक्षेत टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचा दैदिप्यमान झेंडा!

१०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांची राज्य व जिल्हा पातळीवर झळाळती कामगिरी हर्ष प्रदीप चोरघे याचा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहावा क्रमांक 

Spread the love

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित करत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय परीक्षा २०२५-२६ मध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच राज्य पातळीवर उल्लेखनीय स्थान पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश मिळवले.

हर्ष प्रदीप चोरघे याने १४०/१५० गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम व राज्यात सहावा क्रमांक पटकावला. साई दिपक शिंदे, जिविका चंद्रकांत कांबळे आणि स्वराली स्वप्निल क्षीरसागर यांनी प्रत्येकी १३८/१५० गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय व राज्यात सातवा क्रमांक मिळवला. तसेच दुर्वा अतिष मोरे हिने १३६/१५० गुणांसह जिल्ह्यात तृतीय व राज्यात आठवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

या यशामागे शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. वर्गशिक्षक श्री. अतुल गायकवाड आणि वर्गशिक्षिका सौ. रुपाली गायकवाड यांच्या नियोजनबद्ध अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली. तसेच गटशिक्षणाधिकारी मा. शिल्पा रोडगे मॅडम, विस्ताराधिकारी श्री. बनकर साहेब, केंद्रप्रमुख सौ. संगीता भालघरे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री. मारुती लायगुडे सर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे ही यशोगाथा शक्य झाली.

या उज्ज्वल यशामुळे टाकवे बुद्रुक शाळेने ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे कौतुक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button