पिंपरी चिंचवडमावळराष्ट्रीयसामाजिक

अवकाळी पावसामुळे भात पिकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्या

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

Spread the love

 

    वडगाव मावळ– मावळ तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असल्याने शेतातील काढण्यासाठी आलेलं पीक हातातून जाण्याची वेळ मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे

याबाबत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले असुन निवेदनात निसर्गाच्या लहरीच्या अवकाळी पावसामुळे भात पेरणीच्या वेळी माहे मे मध्ये पाऊस सुरु झाल्यामुळे पेरणी पुरेशी होऊ शकली नाही, त्यामुळे भात लागवड कमी झाली तसेच आहे त्या पाश्र्थिती मध्ये शेतकरी बाधवाणी भात रोपे गोळाकरून काही प्रमाणात भात लागवड केली आहे आजच्या स्थितीला भात कापणीला आले असताना अचानक आवकाळी पावसामुळे भात पिके जमिनीदोस्त झाली असून भात पडून गेले आहे, शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे, कुटुंबाचा निर्वाह कसा करायचा व घेतलेले कर्ज कसे फेडायचे अशा कोंडीत सापडला आहे. आपण आपल्या प्रशासणाच्या माध्यमातून त्वरित पंच नामे करून नुकसान भरपाई व विमा भरपाई त्वरित मिळून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे

यावेळी संघटनमंत्री नारायण ठाकर, चेअरमन शांताराम लष्करी, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मारुती असवले,सरपंच शिवाजी करवंदे, सरपंच भिकाजी भागवत,कोडेश्वर दींडी अध्यक्ष किसन गवारी, माजी सरपंच भोयर बळीराम भोईरकर युवा नेते भास्कर पिचड, सदाशिव निसाळ, माजी सरपंच मारुती खामकर आदीजण उपस्थितीत होते.

 

“मावळ तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या भागातील सुवासिक इंद्रायणी तांदूळाला बाहेर देशात देखील अधिक प्रमाणात मागणी असते परंतु यंदा अचानक होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठा फरक पडणार असुन नुकसान झालेल्या ठिकाणी सरकार कडून त्वरित पंचनामे करावे. 

– नारायण ठाकर संघटन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस मावळ

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button