भोयरेतील ‘भैरवनाथ राईस मिल’मध्ये अत्याधुनिक तांदूळ प्रक्रिया केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या आशांना नवे पंख
दर्जेदार तांदूळ मिळण्याचे मावळ तालुक्यातील एकमेव ठिकाण

भोयरे,मावळ – कृषीप्रधान मावळ तालुक्याच्या भातपट्ट्यात शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरत असलेल्या भैरवनाथ राईस मिल मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंद्रायणी भात खरेदी व तांदूळ विक्रीचे अधिकृत केंद्र असल्याने परिसरातील भात उत्पादकांना एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
भोयरे येथील या राईस मिलमध्ये तयार होणारे तांदूळ प्रकार गुणवत्ता, सुगंध आणि पौष्टिक मूल्यामुळे विशेष ओळख निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे
राईस मिलमध्ये खालील प्रीमियम दर्जाचे तांदूळ प्रकार उपलब्ध असणार आहेत—
•मावळचा प्रसिद्ध सुवासिक इंद्रायणी तांदूळ
•निवडक जिरा कोलंब
•शुद्धता जपणारा आंबेमोहोर (मावळ व मुळशी)
•पारंपरिक चवीचा गावठी सुरती तांदूळ
•उच्च प्रतीचा बासमती मझूमती
•पौष्टिक व शुद्ध हातसडी तांदूळ
•तसेच ग्राहकप्रिय कणी तांदूळ
राईस मिलमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे भात भरडणीची अचूकता वाढून जास्तीत जास्त उत्पादनक्षमता साध्य होणार असुन. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर, तर ग्राहकांना स्वच्छ, गुळगुळीत व गुणवत्तापूर्ण तांदूळ मिळण्याची हमी मिळत आहे या राईस मिलच्या स्थापनेमुळे मावळ तालुक्यातील कृषी क्षेत्रात आणखी एक मजबूत पायाभूत सुविधा उभी राहिली असून, शेतकरी व ग्राहक दोघांनाही या उपक्रमाचा व्यापक लाभ होत आहे.
“मावळातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना भात प्रक्रियेसाठी दूरवर जावे लागू नये आणि ग्राहकांना प्रीमियम दर्जाचा तांदूळ सहज उपलब्ध व्हावा, हा ‘भैरवनाथ राईस मिल’ सुरू करण्यामागचा मुख्य हेतू आहे.”
– बळीराम भोईरकर ,संचालक भैरवनाथ राईस मिल भोयरे ता.मावळ जिल्हा पुणे
