मावळ

सुसाट अवजड वाहतुकीमुळे राजपुरी–बेलज–टाकवे मार्ग धोकादायक; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

सोमवारी अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी

Spread the love

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील राजपुरी–बेलज–टाकवे या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावर सध्या सुरू असलेल्या क्रेशर व्यवसायामुळे अवजड ट्रक, डंपर आणि अन्य मालवाहू वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, रस्त्यावर सतत सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात क्रेशर व्यवसायाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे खडी, मुरूम आणि इतर बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी दिवसभर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अनेक वाहनचालक अवजड वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत नसल्याने रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यांची स्थितीही खराब असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक तसेच सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

•मागील दोन महिन्यात तीन अपघात

टाकवे -बेलज -राजपुरी मार्गावर मार्गावर दोन महिन्यात तीन वेळा अपघात झाला असून दोन वेळा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांने पलटी झाली आहे तर एका वाहनाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला गेल्या असल्याच्या घटना झाल्या याबाबत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली याबाबत नागरिकांनी वाहनांचा अतिवेगवान वाहतूक करत असल्याने अपघाताला निमंत्रण देत असल्याचे सांगण्यात येत आहे

“राजपुरी–बेलज–टाकवे मार्गावर अवजड वाहनांचा वेग खूपच जास्त असतो. रस्त्यावर शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. त्यामुळे दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो,” 

– मधुकर कोकाटे – ग्रामस्थ बेलज

 “क्रेशर व्यवसायामुळे रस्त्यावर दिवसभर धुळीचे ढग उडत असतात. अवजड वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर, सूचना फलक आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.”

-रोहीत वाघमारे,स्थानिक ग्रामस्थ टाकवे बुद्रुक

 

• सोमवारी वाहतूक अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी

सोमवारी टाकवे गावात आठवडे बाजार भरत असल्याने या दिवशी भाजी पाला बाजार खरेदी करण्यासाठी नागरीक मोठी गर्दी करतात यावेळी खंडोबा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने सोमवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button