सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श! अतुलभाऊ मराठेंच्या तत्परतेमुळे वराळेतील विद्यार्थ्यांचा ‘परीक्षेचा’ मार्ग सुखकर

वराळे: – ‘विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य असतात’, ही उक्ती केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता, ती कृतीतून सिद्ध करण्याचे काम वराळे गणातील युवा नेतृत्व श्री. अतुलभाऊ काळुराम मराठे यांनी केले आहे. आज ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तत्परतेने बसची व्यवस्था करून दिली. त्यांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज दिनांक २८/१२/२०२५ रोजी श्री भैरवनाथ मंदिर, वराळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्रावर जाण्यासाठी वाहनाची तातडीने आवश्यकता होती. वेळेत वाहन उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात येताच श्री. अतुलभाऊ मराठे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांसाठी तत्काळ बसची सोय उपलब्ध करून दिली.
अतुलभाऊंनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले आणि पालकांसह शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दाखविलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे.
या अनमोल सहकार्याबद्दल भैरवनाथ विद्या मंदिर, वराळे यांच्या वतीने प्रशासनाने अतुलदादा मराठे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. संकटाच्या वेळी धावून जाण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळे “अडला हरी, गाढवाचे पाय धरी” न म्हणता “अडल्या वेळी, अतुलदादांची साथ खरी” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



