वडगाव नगरपंचायत

वडगाव नगरपंचायत प्रभाग १६ मध्ये विकासाची सलग वाटचाल; सायलीताई म्हाळसकरांच्या कार्यकाळातील कामगिरी ठरतीय प्रभावी”

लेखाजोखा मांडणाऱ्या एकमेव लोकप्रतिनिधी सायली म्हाळसकर

Spread the love

वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक १६ मध्ये मागील पंचवार्षिक कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा ठसा आजही ठळकपणे जाणवत आहे. नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सायलीताई म्हाळसकर यांनी रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सुशोभीकरण आणि क्रीडा सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांवर केंद्रित कामे केल्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून समोर येत आहे.
सायलीताईंच्या नेतृत्वाखाली विविध महत्वाच्या पायाभूत कामांना वेग आला. काही ठिकाणी दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. बंदिस्त गटार, रस्त्यांचे डांबरीकरण, फुटपाथ निर्मिती, पुलाची उभारणी, स्ट्रीट लाईट व भूमिगत केबल यांसारखी कामे पूर्ण करत प्रभागाचा दर्जा उंचावण्यात आला वडगाव नगरपंचायती मधील एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे.

🔹 मागील पंचवार्षिक मध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे

गुरुकृपा सोसायटी–मावळ शेडस ओढा : बंदिस्त गटर लाईन – ₹7,00,000

पैसाफंड साखळी रस्ता–साई सृष्टी तसेच लोटस भक्तीसागर–लोटस संकुल रस्ता डांबरीकरण – ₹11,68,366

साखळी रस्त्यावर रबरी गतिरोधक बसविणे – ₹75,756

लोटस भक्तीसागर–लोटस संकुल : संरक्षित भिंत, ड्रेनेज पाईप व फुटपाथ – ₹31,21,513

विट्ठल, हनुमंत व बाळासाहेब म्हाळसकर निवासस्थानाकडे जाणारा रस्ता (खडीकरण) – ₹5,00,000

MIDC रस्ता–म्हाळसकर निवासस्थान रस्ता (खडीकरण) – ₹4,00,000

खंडोबा मंदिर–MIDC रोड : बंदिस्त गटार, रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण – ₹2,15,30,756

साखळी रस्त्यावरील विद्युत तारा व खांबांचे स्थलांतर – ₹1,00,000

स्मशानभूमी–रेल्वेलाईन बंदिस्त गटर लाईन – ₹73,46,183

साईसृष्टी मार्ग : संरक्षित भिंत, कर्बस्टोन, पेव्हिंग ब्लॉक फुटपाथ – ₹23,47,647

साईसृष्टी रस्ता उजवीकडील बाजूस दगडी सुशोभीकरण – ₹10,00,000

MIDC रोड जोडण्यासाठी पूल (ब्रिज) – ₹5,00,000

स्ट्रीटलाईट व भूमिगत केबल (मुख्य रस्ता–साई सृष्टी) – ₹79,44,109

जाखमाता पाणीपुरवठा योजना – पाईप जोडणी – ₹15,50,290

सौर हायमास्ट दिवे बसविणे – ₹15,00,000

बालउद्यान व ओपन जिम (४०/२ ओपन स्पेस) – ₹2,23,76,209

आयुर्वेदिक/फुलझाडांची लागवड – ₹3,00,000

ज्योतीबानगर शिवस्मारक व परिसर सुशोभीकरण – ₹3,00,000

बस स्टॉप, भाजी मंडई व फूटपाथ बांधकाम – ₹9,00,000

भिंतींचे चित्ररंजन व रंगकाम – ₹4,50,000

भव्य क्रीडा संकुल उभारणी – ₹40,00,000

सायलीताई म्हाळसकर यांच्या कामकाजाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आगामी अपूूर्ण निवडणुकीत त्यांच्याकडून पुढील विकासाची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रभागातील सुरळीत नागरी सुविधा व कामांची गुणवत्ता पाहता मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button