मावळ

प्राचार्य राजेंद्र डोके व प्रा. डॉ. मनोज गायकवाड यांना राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार

.

Spread the love

वडगाव मावळ : हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज, वडगाव मावळचे प्राचार्य प्रा. राजेंद्र डोके आणि प्राध्यापक डॉ. मनोज गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा मान Avishkar Social And Educational Foundation Kolhapur या संस्थेकडून प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असताना समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन व विविध समाजजागृतीपर उपक्रम राबविण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सदर राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी Solapur येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल मावळ तालुक्यातून दोन्ही मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोकजी बाफना तसेच सर्व संचालकांनी त्यांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वडगाव परिसरातील मान्यवर, मित्रमंडळी व नागरिकांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button