कुस्ती स्पर्धा

‘मावळ केसरी’चे रणशिंग फुंकले! नवलाख उंबरेत वासापूजन सोहळा दिमाखात संपन्न; २८ डिसेंबरला रंगणार कुस्तीचा थरार

Spread the love

    नवलाख उंबरे (ता. मावळ)मावळ तालुक्याच्या क्रीडा विश्वात मानाचा तुरा समजल्या जाणाऱ्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६’ च्या तयारीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. नवलाख उंबरे येथे या स्पर्धेचा वासापूजन सोहळा हजारो कुस्तीप्रेमींच्या साक्षीने आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. युवा नेते प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या हस्ते विधीवत पूजा करून स्पर्धेच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला. येत्या २८ डिसेंबर रोजी नवलाख उंबरेच्या लाल मातीत कुस्तीचा हा महासंग्राम रंगणार आहे.

• भव्य नियोजनाने वेधले लक्ष
‘युवा मंच’च्या माध्यमातून प्रशांत दादा भागवत हे सातत्याने भव्य-दिव्य उपक्रमांचे आयोजन करत असतात. यंदाच्या मावळ केसरी स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आकर्षक बक्षिसे आणि काटेकोर नियोजन सध्या मावळात चर्चेचा विषय ठरले आहे. स्पर्धेला आमदार सुनील शेळके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभत असल्याने, हा सोहळा केवळ स्पर्धा नसून मावळच्या कुस्ती परंपरेला नवी उंची देणारा सोहळा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

• मान्यवरांची मांदियाळी
या भव्य वासापूजन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये देविदास पडवळ, नवनाथ पडवळ, तानाजी पडवळ, रामदास शेटे, चंद्रकांत शेटे, जालिंदर शेटे, रामनाथ बधाले, अरुण पवार, राजू कडलक, अतुल मराठे, सोमनाथ पडवळ, बजरंग पडवळ, सुरेश अगळमे, मुकुंद अगळमे, मारुती आडकर, संभाजी राक्षे, खंडू वाळुंज, नागेश राक्षे, भरत लिम्हण, गणेश लिम्हण, राकेश सोरटे, गजानन राक्षे, धोंडिबा आडकर, दिपक दाभाडे, स्वप्नील शेटे, दत्तात्रय शेवकर, दत्ता भाऊ शेटे, नागेश शिर्के, माऊली दहातोंडे, माणिक जाधव, भरत घोजगे, भानुदास दरेकर, राजेंद्र मिरगे, प्रदीप बनसोडे, रामनाथ धुमाळ, बाबासाहेब घोजगे, प्रकाश घोजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महिला भगिनींची उपस्थितीही लक्षणीय होती. मोहिनी ताई कलावडे, शोभा ताई शिर्के, स्वाती ताई पापल, पूनम ताई पडवळ, सुमन ताई शिर्के, आनंदी बाई वाळुंज, शिल्पा ताई विक्रम कदम, पूनम तानाजी पडवळ, कल्पना जाधव, अल्काबाई कार्ले, शुभांगी कदम, सुरेखा जाधव, मनीषा खंडागळे, सविता मेंगळे, कल्पना मेंगले, बबाबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

• स्पर्धेची उत्सुकता शिगेला
मावळ तालुक्यात कुस्तीला मोठी परंपरा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित मल्लांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, २८ डिसेंबरला होणाऱ्या या दंगलीकडे (कुस्ती स्पर्धेकडे) संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कंबर कसली असून, हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि रुबाबदार होईल, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button