मावळ

संघर्षाच्या राखेतून उभा राहिलेला फिनिक्स – संतोष आंबेकर 

Spread the love

टाकवे बुद्रुक – (प्रतिनिधी) टाकवे बुद्रुकच्या मातीतला एक साधा मुलगा… पण नियतीने मात्र त्याच्यासमोर अतिशय कठोर परीक्षा उभी केली. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले आणि आयुष्य एका क्षणात बदलून गेले. ज्या खांद्यावर खेळण्याचे दिवस असायला हवे होते, त्याच खांद्यावर अचानक कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. आईच्या डोळ्यातील अश्रू, घरातील संघर्ष आणि उद्याच्या अनिश्चिततेने त्याच्या मनाला अक्षरशः हादरवून टाकले… पण तो कोसळला नाही.

 

• तो उभा राहिला… स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी.

आई, भाऊ,भावजय आणि पत्नीच्या साथीने संतोष आंबेकर यांनी घरगुती डबे तयार करण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. कधी ऑर्डर मिळायची, कधी नाही… कधी दिवस चांगला जायचा, तर कधी रिकाम्या हाताने परतावे लागायचे. पण प्रत्येक अपयशानंतर त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. आईच्या हातची चव, पत्नीची साथ आणि स्वतःची जिद्द—यांनी हळूहळू त्या छोट्या व्यवसायाला आकार देण्यास सुरुवात केली.कष्टाच्या घामाने आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी विश्वास जिंकला… आणि तो विश्वासच त्यांची खरी भांडवल ठरली.आज तोच छोटासा डब्यांचा व्यवसाय ‘जान्हवी हॉटेल’ या नावाने उभा आहे—एक स्वप्न, जे अश्रूंमधून आणि संघर्षातून साकार झाले. या हॉटेलमध्ये फक्त जेवण नाही, तर प्रत्येक घासामध्ये त्यांचा संघर्ष, आईची माया आणि कुटुंबाचा त्याग मिसळलेला आहे.याचं कष्टाच्या जोरावर स्वप्नातील घर साकारत आईच्या कष्टाचा सन्मान करत कुंदाई निवास मोठ्या दिमाखात उभारले आहे

संतोष आंबेकर यांची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर परिस्थितीवर मात करून उभं राहण्याची जिवंत प्रेरणा आहे. आयुष्याने कितीही कठीण वळणं दिली, तरी जिद्द, कष्ट आणि कुटुंबाचा आधार असेल, तर अशक्य काहीच नाही—हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त…त्या प्रत्येक अश्रूंच्या थेंबाला, प्रत्येक कष्टाच्या क्षणाला आणि प्रत्येक स्वप्नाला सलाम! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा संतोष आंबेकर 🎉तुमचा संघर्ष असाच अनेकांना प्रेरणा देत राहो… आणि यशाची ही वाटचाल अधिक उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button