निधन वार्ता

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आदर्श माता पार्वताबाई कोंडे यांचे निधन

Spread the love

टाकवे बुद्रुक : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व तसेच प्रसिद्ध दुग्ध व्यवसायिक कोंडे परिवारातील आदर्श माता कै. पार्वताबाई किसन कोंडे (वय ९७) यांचे आज सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकवे बुद्रुक परिसरातील वारकरी संप्रदायासह सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पार्वताबाई कोंडे यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करत कोंडे परिवाराच्या परंपरेला भक्कम आधार दिला. त्यांच्या साध्या, शांत आणि धार्मिक वृत्तीमुळे त्या परिसरात सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या होत्या. वारकरी संप्रदायाशी त्यांचा घट्ट संबंध होता आणि त्यांनी आयुष्यभर भक्ती, सेवा आणि कष्ट यांचा आदर्श ठेवला.

त्यांच्या पश्चात श्री. रामभाऊ किसन कोंडे, श्री. प्रकाश किसन कोंडे, श्री. अशोकराव किसन कोंडे यांच्यासह संपूर्ण कोंडे परिवार असा मोठा परिवार आहे.

कै. पार्वताबाई कोंडे यांचा अंत्यविधी आज सकाळी ११ वाजता टाकवे बुद्रुक येथील बाराव विहीर स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button