मावळ

पुणे जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे यांनी गट शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली  

शून्य शिक्षक शाळा व अवघड क्षेत्रातील शाळांच्या समस्या सोडवण्यावर सविस्तर चर्चा

Spread the love

वडगाव मावळ – पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अनंता पावशे यांनी शिक्षक व शाळांशी संबंधित विविध अडी-अडचणी व प्रश्नांबाबत आज गट शिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे यांची भेट घेतली. या भेटीत शाळा व शिक्षकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील, यावर सविस्तर चर्चा झाली. विशेषत: शून्य शिक्षक शाळा आणि अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळा यांच्या समस्यांवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा व मावळ तालुका ट्रायबल फोरमचे अध्यक्ष विक्रम हेमाडे, मुख्याध्यापक व ट्रायबल फोरम संघटनेचे सचिव व मार्गदर्शक भीमा शंकर लोटे सर, ट्रायबल फोरम विभागीय अध्यक्ष बाळासाहेब दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

 

अनंता पावशे यांनी गट शिक्षण अधिकारी यांना शाळा-शिक्षकांच्या प्रत्यक्ष अडचणींची माहिती दिली आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. उपस्थित ट्रायबल फोरम प्रतिनिधींनीही अवघड भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, मूलभूत सुविधा यासंबंधी आपल्या सूचना मांडल्या. गट शिक्षण अधिकारी यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या भेटीमुळे जिल्ह्यातील शून्य शिक्षक शाळा व दुर्गम भागातील शाळांच्या समस्या लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button