खांड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भिमराव पिंगळे यांची बिनविरोध निवड; राजकीय व सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

टाकवे बुद्रुक- खांड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी (अध्यक्ष) भिमराव पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते चेअरमन मारुती वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे पिंगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वडगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष सभा पार पडली. चेअरमन पदासाठी केवळ भिमराव पिंगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी निखारे यांनी पिंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. संस्थेचा कारभार पारदर्शी आणि लोकहिताचा असावा, या उद्देशाने सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन भिमराव पिंगळे यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सरपंच नामदेव शेलार, खरेदी-विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, अनिल असवले, माजी सरपंच भूषण असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर, दिलीप आंबेकर, ऋषीनाथ शिंदे साहेबराव टेमगिरे, विलास साबळे आदी मान्यवरांचा समावेश होता.
तसेच, या प्रसंगी सुभाष देशमुख, बाळू तिकडे, किसन वणघरे, मावळते चेअरमन मारुती वाडेकर, आप्पा तुर्डे, बळीराम वाडेकर आणि अनिल आलम यांच्यासह सोसायटीचे संचालक, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमराव पिंगळे यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कामाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



