टाकवे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पल्लवी असवले यांची नियुक्ती

टाकवे बुद्रुक — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने टाकवे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पल्लवी सनेश असवले यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पल्लवी असवले यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती यासह सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सबलीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून पक्षसंघटनेत त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ टाकवे शहरातील महिला संघटन मजबूत करण्यासाठी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या नियुक्तीमुळे टाकवे शहरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याला नवी दिशा व ऊर्जा मिळेल, तसेच महिलांचे प्रश्न, हक्क आणि विकासासाठी प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



