राजकीय

स्व. प्रभाकरराव मालपोटे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत तज्ञ संचालक पदावर भरत लष्करी व बळीराम भोईरकर यांची नियुक्ती”

Spread the love

टाकवे बुद्रुक – स्व. प्रभाकरराव मालपोटे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितच्या तज्ञ संचालक पदी श्री. भरत लष्करी व श्री. बळीराम भोईरकर यांची निवड करण्यात आली असून संस्थेच्या कार्यात नवचैतन्य आणणारा हा निर्णय मानला जात आहे.

संस्थेच्या नियमित कामकाजाला गती देणे, कर्जवाटप प्रक्रियेला अधिक पारदर्शकता देणे, सदस्य हिताचे निर्णय वेगाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने राबविणे या दृष्टीने तज्ञ संचालकांची भूमिका महत्वाची असते. दोन्हीही नव्याने नियुक्त झालेले संचालक समाजकार्यात सक्रिय असून संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचे अनुभव उपयोगी पडतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीसाठी संस्थापक अध्यक्ष नारायण मालपोटे, अध्यक्ष सोमनाथ असवले कार्याध्यक्ष विलास मालपोटे उपाध्यक्ष नवनाथ मोढवे, खजिनदार विश्वास मालपोटे, संचालक बबन ओव्हाळ, संचालिका श्रीमती चंद्रलेखा जाधव,श्रीमती कमल मालपोटे, सुशिला मालपोटे, यांनी भरत लष्करी आणि बळीराम भोईरकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button