टाकवे पंचायत समिती गणातील महिलांसाठी सुवर्णसंधी! सौ. अश्विनीताई कोंडे यांच्या पुढाकाराने मोफत ‘धम्मगिरी-नागपूर दीक्षाभूमी’ दर्शन यात्रेचे आयोजन

टाकवे (मावळ) – मावळ तालुक्याचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार मा. श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांच्या वतीने टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातील सर्व माता-भगिनींसाठी एका विशेष धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना ‘धम्मगिरी नागपूर दीक्षाभूमी’ येथे मोफत दर्शन घडवून आणले जाणार आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देण्याची अनेक महिलांची इच्छा असते. हीच भावना लक्षात घेऊन सौ. अश्विनीताई कोंडे यांनी या मोफत रेल्वे दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा दोन दिवसांची असणार असून, यात फक्त महिलांना प्रवेश दिला जाईल.
सदर यात्रेसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक महिलांना १५ जानेवारीपर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वयोमर्यादा: १८ वर्षांपुढील महिला.
आपल्या सोबत आवश्यक कागदपत्रे: नावनोंदणीसाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक. ही यात्रा मोफत रेल्वेने आयोजित केली आहे. नियोजित दिवशी सकाळी ६ वाजता टाकवे बुद्रुक गावात उपस्थित राहणे अनिवार्य असेल.
या उपक्रमामुळे टाकवे परिसरातील महिलांना एकत्रितपणे धार्मिक स्थळाला भेट देण्याची आणि सामाजिक एकोपा जपण्याची संधी मिळणार आहे. तरी टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांनी केले आहे.नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:स्वप्निल जाधव (९७६७६२०१९४), अजय जाधव (९६२३०५५०५४), अमित ननावरे (८८५७९१३२४९), अनिकेत भ. जाधव (८७९६६०७१००).



