निधन वार्ता

भोयरे येथील अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर आशाबाई डोळस यांचे दुःखद निधन

Spread the love

वडगाव मावळ प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील भोयरे येथील अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर कै. आशाबाई विलास डोळस (वय ५९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भोयरे गावासह संपूर्ण मावळ परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कै. आशाबाई डोळस यांनी अनेक वर्षे अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत ग्रामीण भागातील महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी मोलाचे योगदान दिले. आरोग्य जनजागृती, माता-बाल संगोपन, लसीकरण मोहिमा आणि विविध शासकीय आरोग्य उपक्रमांमध्ये त्यांनी निष्ठेने काम करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्या सचिन विलास डोळस यांच्या मातोश्री होत. तसेच कल्हाट येथील प्रगतशील शेतकरी शांताराम दशरथ पवार व सगाजी दशरथ पवार यांच्या त्या भगिनी, तर लिलाबाई नामदेव गायकवाड यांच्या सख्ख्या बहिण होत.

कै. आशाबाई डोळस यांच्या स्मरणार्थ जलदान (पुण्यस्मरण) विधी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, सहकारी, आरोग्य कर्मचारी आणि नातेवाईकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त होत असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button