टाकवे बुद्रुक – टाकवे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया वडगाव निबंधक कार्यालयात नुकतीच संपन्न झाली मावळते चेअरमन तानाजी गुणाट यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली
सदर जागेसाठी जालिंदर मालपोटे व सदाशिव जाभुळकर यांचे अर्ज प्राप्त झाल्याने जागेसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत दोघांना समान मते पडल्याने अखेर चिठ्ठीवर निकाल जाहीर करत जालिंदर मालपोटे यांची निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केले
या प्रसंगी खरेदी-विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, संचालक विलास मालपोटे, व्हा चेअरमन विकास असवले,माजी चेअरमन तानाजी गुणाट, पांडुरंग मोढवे, माजी व्हा. चेअरमन जितेंद्र परदेशी, योगेश गायकवाड, संचालक सुप्रिया मालपोटे, सुलाबाई असवले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच उद्योजक अनिल मालपोटे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, माजी चेअरमन रघुनाथ मालपोटे, माजी चेअरमन दामूशेठ खरमारे, उपसरपंच परशुराम मालपोटे, उद्योजक शेखर मालपोटे, काशिनाथ जांभुळकर सचिव मदन आडीवळे यांसह अनेकांनी जालिंदर मालपोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
“माझ्यावर सोसायटीच्या सर्व संचालक व सदस्यांनी दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. निवड प्रक्रियेत चुरस असूनही सर्वांनी दाखवलेली शिस्त आणि सहकारभाव प्रशंसनीय आहे. टाकवे विविध कार्यकारी सोसायटीचा सर्वांगीण विकास, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सदस्यांच्या हिताला प्राधान्य देणे ही माझी पहिली जबाबदारी असेल. कृषी कर्जपुरवठा, महिला बचतगटांना प्रोत्साहन, तरुण उद्योजकांना सहकार्य आणि सोसायटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे. सर्वांच्या सहकार्याने सोसायटीला नवे उंचीवर नेऊ, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
– नवनिर्वाचित चेअरमन जालिंदर मालपोटे



