टाकवे बुद्रुक– टाकवे पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे ( असवले ) यांच्या माध्यमातून टाकवे पंचायत गणातील सर्व माता-भगिनींसाठी मावळचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार मा. श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली ७००० माता-भगिनींसाठी मोफत सप्तशृंगी देवी (वणी, नाशिक) एकदिवसीय दर्शनयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला विकास, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक श्रद्धा जोपासण्याच्या हेतूने अत्यंत भव्य, उत्कृष्ट आणि सुव्यवस्थित अशा या यात्रेचे आयोजन रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले असून यात्रेच्या निमित्ताने सर्व माताभगिनींसाठी भोजन व्यवस्था, वाहन व्यवस्था तसेच सप्तशृंगी गडावर चढाईसाठी रोप-वेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवास सुरक्षित व सोयीस्कर होण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या यात्रेमुळे टाकवे बुद्रुक परिसरातील महिलांना एकत्र येण्याची, धार्मिक वातावरणाचा लाभ घेण्याची आणि अध्यात्मिक उर्जेचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली असून सर्व महिलांना यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्विनी कोंडे (असवले) यांनी केले आहे
यात्रेत सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा 9527970734, 9762623407, 9309910282, 7744861889, 7083505089,8459032704



