निधन वार्ता

माऊ येथील आदर्श माता कै. लिलाबाई बनजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; 

मंगळवारी दशक्रिया विधी व प्रवचन ह.भ.प. अॅड. शंकर महाराज शेवाळे यांचे प्रवचन रूपी सेवा होणार

Spread the love

मावळ — माऊ येथील आदर्श माता कै. लिलाबाई बनजी शिंदे यांचे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै. लिलाबाई शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशक्रिया विधी मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ह.भ.प. अॅड. शंकर महाराज शेवाळे यांचे प्रवचन रूपी सेवा होणार आहे.

हा कार्यक्रम मु. माऊ पों. टाकवे, ता. मावळ, जि. पुणे येथे पार पडणार असून, आप्तेष्ट, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या शोकाकुल प्रसंगी शोकाकुल कुटुंबीय म्हणून श्री. गणेश बनाजी शिंदे (मुलगा),सौ. पूनम विष्णू जांभूळकर (मुलगी),सौ. विद्या दिपक शेळके (मुलगी) ,सौ. संध्या सागर लष्करी (मुलगी),श्री. एकनाथ केशव शिंदे (दिर),श्री. बाळू केशव शिंदे (दिर),कु. दिनेश सोपान शिंदे (पुतण्या),सौ. गंगुबाई गुलाब लष्करी (ननंद),श्री. एकनाथ गोपाळ जगताप (भाऊ),श्री. मच्छिंद्र गोपाळ जगताप (भाऊ),सौ. सहिंद्राबाई प्रकाश शिंदे (बहिण),सौ. भानुप्रिया पोपट लष्करी (बहिण) सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

समस्त शिंदे परिवार व सगेसोयरे — माऊ-राजपूरी- टाकवे ग्रामस्थ यांच्या वतीने कै. लिलाबाई शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button