टाटा पॉवरकडुन २० गुंठे जागा मिळवण्यास वडेश्वर ग्रामस्थांना यश
लवकर जागेवर होणार प्रशासकीय इमारतीचे भुमिपुजन
टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील आंदर मावळामधील वडेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पॉवर च्या मालकीची २० गुंठे जागा मिळवण्यास अखेर यश मिळाले असुन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जागेची कागदपत्रे हस्तांतरण प्रकिया पार पडली
जागा उपलब्ध झाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांना गती मिळणार असून सदर जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच तलाठी कार्यालय या प्रशासकीय इमारती उभारण्यात येणार आहे सदर विकासकामांना निधी मंजूर असून जागेची उपलब्धता नसल्याने विकासकामे रखडली होती पाच वर्षांपासून जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनाकडुन टाटा पॉवरकडे पाठपुरावा सुरू होता लवकर याठिकाणी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सुरू होईल अशी माहिती सरपंच छाया हेमाडे यांनी दिली.
जागेच्या कागदपत्रे हस्तांतरण प्रकिया वेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजु खांडभोर, टाटा पॉवरचे अधिकारी मनोहर म्हात्रे, राजेंद्र गावडे, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सरपंच छायाताई हेमाडे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन कासार, माजी उपसरपंच वासुदेव लष्करी, ग्रामपंचायत सदस्या मनीषा दरेकर, लिपिक वासुदेव तनपुरे आरोग्य अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी,आदी मान्यवर उपस्थित होते.



