टाकवे बुद्रुकमध्ये पवना सहकारी बँकेच्या २४व्या शाखेचे भव्य उद्घाटन

टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे पवना सहकारी बँक लिमिटेडच्या २४व्या शाखेचे उद्घाटन उत्साहात आणि थाटामाटात पार पडले. सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या पवना सहकारी बँकेने स्थानिक नागरिकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही नवीन शाखा सुरू केली आहे.
या उद्घाटन समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे संचालक मंडळ सदस्य तसेच टाकवे बुद्रुक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर उद्घाटन समारंभास मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णां शेळके, बँकेचे संस्थापक आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, बँकेचे अध्यक्ष शांताराम गराडे, बँकचे उपाध्यक्ष वसंत लोंढे संचालक विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे,जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, मावळ पंचायत समिती सदस्या प्राचीताई देवाभाऊ गायकवाड, मावळ पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, पंचायत समिती सदस्य दिपक ढोरे,मावळ पंचायत समिती सदस्या आशाताई मोरमारे, सरपंच संध्या असवले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विलास मालपोटे, उद्योजक संदीप दाभाडे, (पुणे पिपल्स बँक संचालक संजीव असवले,संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले,मावळ खादी ग्रामोद्योग अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मारुती असवले, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते राज खांडभोर, उद्योजक अनिल मालपोटे, माजी चेअरमन योगेश गायकवाड, मावळ तालुका भाजप सरचिटणीस रोहिदास असवले, माजी उपसरपंच तानाजी असवले,उद्योजक लहुभाऊ वाडेकर, शरद मालपोटे, माजी शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, गोरक्षक अमित असवले, डॉ. सुनील औटी, राजाराम असवले, साहेबराव टेमगिरे,जिप संघटना उपाध्यक्ष उल्हास असवले, युवा उद्योजक दिनेश असवले, सोमनाथ (आबा) असवले, टाकवे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबुशेठ ओसवाल, माजी सरपंच भुषण असवले, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, माजी युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बाबाजी गायकवाड, माजी चेअरमन पांडुरंग मोढवे, मा. सदस्य राजू असवले, पोलीस पाटील अतुल असवले, सोपान असवले सर, उद्योजक सूरज सातकर, भरत सातकर, माजी चेअरमन नारायण मालपोटे, विकास असवले, नथुशेठ जाधव,हभप. देवराम महाराज असवले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मोढवे, अतुल जाधव, उद्योजक रमेश असवले, प्रसिद्ध गाडामालक विलास असवले व माजी चेअरमन दत्ता घोजगे यांच्यासह बँकेचे संचालक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवना सहकारी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकाभिमुख सेवा आणि विश्वासार्ह कामकाज यामुळे सभासदांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. टाकवे बुद्रुक येथे सुरू झालेली ही नवीन शाखा टाकवे बुद्रुक, मावळ आणि नाणे मावळ परिसरातील शेतकरी, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकिंग सेवा अधिक सुलभ करणार आहे.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, स्थानिक आर्थिक विकासात या शाखेची महत्त्वाची भूमिका राहील, असा विश्वास व्यक्त केला. टाकवे बुद्रुक शाखेच्या उद्घाटनामुळे पवना सहकारी बँकेच्या विस्ताराला आणखी एक महत्त्वाचा टप्पा प्राप्त झाला आहे.



