पिंपरी चिंचवडमावळराजकीय

टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार मधुकर कोकाटे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी साधला संवाद 

.

Spread the love

 

टाकवे – जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार मधुकर कोकाटे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढवत घरोघरी भेट देत मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. टाकवे जिल्हा परिषद गटातील कुसवली गावात त्यांनी दौरा करत ग्रामस्थांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील सर्व घटकांशी जुळवून घेत समाजातील प्रत्येकाच्या अडचणी, अपेक्षा आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न कोकाटे करत असल्याचे या दौऱ्यात दिसून आले.

 

कुसवली गावात पोहोचताच स्थानिक महिलांनी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून मधुकर कोकाटे यांचे स्वागत केले.  या निमित्ताने गावच्या वातावरणात निवडणुकीची रंगत अधिक वाढल्याचे दिसून आले. ग्रामस्थांसोबत संवाद साधताना कोकाटे यांनी शांत संयमी व सुसंस्कृत पद्धतीने आपले विचार मांडले. त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, “या पुढचा काळ हा विकासाचा असेल. अडथळे कितीही असले तरी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेन.”

 

गावातील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी आवश्यक असणारी उपलब्ध पायाभूत सुविधा, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक स्थानिक समस्यांची मांडणी केली. मधुकर कोकाटे यांनी सर्व विषय काळजीपूर्वक ऐकून घेत प्रत्येक समस्या सोडवण्याचा शब्द दिला. “निवडणुकीनंतर गावाला पुन्हा पुन्हा धाव घालून या समस्या टप्प्याटप्प्याने निराकरण करू. विकास हा माझा मुख्य अजेंडा असून तो प्रत्यक्ष कृतीतून दिसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

ग्रामस्थांनीही कोकाटे यांच्या शांत, सुशिक्षित, सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले. शासन योजनांसाठी मिळालेले मार्गदर्शन याचा उल्लेख करत कोकाटेंच्या सेवाभावी भूमिकेचे कौतुक केले. “आमच्या मधला आमचा माणूस असल्यामुळे आम्हाला यांच्यावर विश्वास आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

 

या भेटीदरम्यान युवकांचा उत्साह लक्षणीय होता. गावातील अनेक युवा स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते. परिसरात उत्सवी वातावरण असतानाच ग्रामस्थांचा कोकाटेंना मिळत असलेला प्रतिसाद हा आगामी निवडणुकीत त्यांना लाभदायक ठरेल, असे चित्र पाहायला मिळत आहे.

 

मधुकर कोकाटे यांच्या या प्रचार दौऱ्यामुळे मतदारसंघात निवडणुकीची तयारी अधिक जोरदार होत असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गाव पातळीवरील संवाद आणि सर्वसमावेशक संपर्क मोहीम हेच कोकाटेंच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button