मावळ

एलएलबी परीक्षेत घवघवीत यश; कान्हेच्या सपना सातकर यांची यशस्वी भरारी

Spread the love

वडगाव मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील कान्हे येथील कु. सपना सुरज सातकर यांनी एलएलबी (LL.B.) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत कायद्याची पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कान्हेसह संपूर्ण मावळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लहानपणापासून शिक्षणाची आवड, ध्येयपूर्तीसाठीची जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या बळावर सपना सातकर यांनी हे यश संपादन केले आहे. कठीण परिस्थितीतही हार न मानता चिकाटीने केलेल्या अभ्यासामुळे त्यांनी आपल्या स्वप्नाला यशाची किनार दिली आहे.

या यशामागे त्यांचे पती सुरज सातकर यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. तसेच यशवंत ग्रामीण पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय उभे (मामा) यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनही त्यांच्या यशाचा महत्त्वाचा आधार ठरले.

 

सपना सातकर यांच्या या यशाबद्दल मावळ तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सपना सातकर यांचे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात त्या कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजासाठी आदर्श ठराव्यात, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button