मावळ

चर्मकार समाजातील महिलांचा एकजुटीतून समाजपरिवर्तनाचा संदेश 

मावळात श्री संत रोहिदास समाज सेवा संघाच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

मावळ (प्रतिनिधी) : श्री संत रोहिदास समाज सेवा संघ, मावळ तालुका महिला कमिटीच्या माध्यमातून भव्य महिला मेळावा, हळदीकुंकू समारंभ, लकी ड्रॉ बक्षीस वितरण, ज्येष्ठ महिलांचा सत्कार आणि ‘चिल्लर पार्टी’ संस्कृती कार्यक्रम लोणावळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून महिलांनी एकत्र येऊन समाजपरिवर्तनाची जागृती निर्माण करण्याचा आणि एकमेकींच्या अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याविषयी डॉ. सीमा पानसरे शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले, तर कायदेशीर साक्षरता, बचत गट आणि आर्थिक नियोजन याबाबत अॅड. मोनाली शेलार यांनी उपयुक्त माहिती दिली. उपस्थित महिलांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तरांमध्ये सहभाग नोंदवला.

या मेळाव्यास लोणावळा नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे, खादी ग्रामोद्योग चेअरमन अंकुश आंबेकर, मावळ तालुका अध्यक्ष रमेशजी मानकर, चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दिनेशजी जाधव, उत्पन्न बाजार समिती उपसभापती विलासजी मानकर, चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अशोकजी मानकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंगजी तिखे, सुरेशजी गायकवाड, माजी अध्यक्ष अमोलजी गायकवाड, रघुनाथजी गायकवाड (सर), प्रकाश कदम, अमोल मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच माजी उपनगराध्यक्ष आरोही ताई तळेगावकर, माजी नगरसेविका मंदा ताई सोनवणे, नगरसेविका नैयनाताई पैलकर, सरपंच सुनिता योगेश शिंदे, उपसरपंच (टाकवे) ज्योती दिलीप आंबेकर, उपसरपंच (खांडी) सुकन्या मारुती आंबेकर, उपसरपंच (पाटण) शालन शिळवणे, कार्ला ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा जाधव यासह विविध गावांतील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन महिला कमिटी अध्यक्षा सौ. रेश्माताई मानकर यांनी केले. माजी सरपंच सौ. जामुना गणेश पटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना आरती गायकवाड यांनी केली. सूत्रसंचालन सुष्टी कडू व प्रतिक्षा शिर्के यांनी प्रभावीपणे पार पाडले. प्रियंका पटेकर,नुतन मानकर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकजूट आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांनी संघटितपणे पुढे येत समाजाच्या उन्नतीसाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्यास सौ. निर्मला संजयजी शिळवणे, सौ. सावित्रीताई दत्तात्रय जाधव, सौ. प्रतिभाताई रविंद्र कडू (ग्रंथपाल, लोणावळा), सौ. सुभद्राताई पांडुरंग शिर्के, सौ. दिपाली बा. गायकवाड (कोषाध्यक्ष), सौ. मीनाक्षी सु. गायकवाड, सौ. अश्विनीताई अशोक मानकर, सौ. रश्मी दिनेश जाधव, सुभागी शिर्के, सौ. कल्पनाताई शिर्के, सौ. उर्मिलाताई शाम पवार, सौ. दिपालीताई सांगर शिर्के, श्रीमती सुभद्राबाई कदम, संध्या साहेबराव आंबेकर, निताताई छबुराव गायकवाड, सौ. सुनिताताई मानकर, सौ. वंदनाताई नि. कदम (उपाध्यक्ष), सौ. रत्नाप्रभा म. गायकवाड (सेक्रेटरी), सारीका विकास मानकर, कमलबाई कडू, राजेश्री ताई जाधव, सावित्रीबाई तिखे, रोहिणी मानकर, चित्रा राजू नवले, सुनयना दिनेश पवार आदी महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button