कामशेत येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कामशेत : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामशेत येथील संत रविदास महाराज मंदिर परिसरात भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमात कामशेत शहराध्यक्ष रमेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलासजी मानकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म.न.पा. पुणे सरचिटणीस मा. अनिल कदम, कामशेत सरचिटणीस ज्ञानदेव कदम, मावळ उपाध्यक्ष प्रकाश कदम तसेच मावळ प्रसिद्धीप्रमुख दत्ताभाऊ शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण करून दिली. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.



