राष्ट्रीय

 डॉ. अशोक दाते यांच्या पुढाकाराने टाकवे गावात भव्य आरोग्य शिबिर संपन्न;

 ५०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा घेतला लाभ

Spread the love

टाकवे बुद्रुक – ग्रामीण भागातील नागरिकांना घराच्या जवळच उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने, टाकवे-नाणे गटाचे इच्छुक उमेदवार डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या मार्गदर्शनाखाली टाकवे येथे गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला.

 

शिबिरात प्रामुख्याने नेत्रतपासणी आणि सर्वसाधारण आजारांवर मोफत उपचार व सल्ला देण्यात आला. नेत्रतपासणी विभागामध्ये एकूण ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये लहान मुलांच्या डोळ्यांचे तिरळेपणाचे १२ रुग्ण, काचबिंदू व रेटिनाचे ३५ रुग्ण आणि मोतीबिंदूचे १२३ रुग्ण आढळून आले. तसेच १८० गरजू रुग्णांना चष्म्याचे नंबर काढून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, यातील ३८ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यासाठी औषधोपचार आणि येण्या-जाण्याची व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली.

तसेच, जनरल ओपीडी विभागात १८२ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये रक्तदाब (BP) – ३५, मधुमेह (Sugar) – ६०, हाडे आणि सांधेदुखी (Ortho) – ४७, कान-नाक-घसा (ENT) – २६ आणि बालरोग विभागातील २० रुग्णांचा समावेश होता. या सर्व रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि औषधोपचार देण्यात आले. महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत ०४ गरजू रुग्णांच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया आणि ०२ रुग्णांचे ‘इम्प्लांट रिमुव्हल’ (Implant Removal) पूर्णपणे मोफत करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच अविनाश असवले म्हणाले की, “ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांना अनेकदा आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत डॉ. अशोक दाते यांनी गावातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देऊन मोठे पुण्याईचे काम केले आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.”

या शिबिरासाठी डॉ. अशोक दाते यांच्यासह डॉ. अंकिता मानकर, डॉ. प्राजक्ता वाघमोडे, डॉ. गणेश शिंदे आणि तुषार निघोजकर यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच अविनाश असवले, उपसरपंच आशा मदगे, माजी उपसरपंच परशुराम मालपोटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काळुराम मालपोटे, निवृत्त पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मारुती असवले, सामाजिक कार्यकर्ते सुमंत जगताप, दिलीप आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते भगवान सातकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आरोग्य सेवेचे हे व्रत भविष्यातही असेच चालू राहील आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले जातील,” असा विश्वास डॉ. अशोक दाते यांनी शेवटी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button