प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव,परखड वक्ता यंदा लोणावळा निवडणूकीच्या आखाड्यात अशोक मानकर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषदेची लवकरच निवडणूकीची घोषणा होणार असुन नगराध्यक्ष पदासाठी तगडा प्रशासकीय कामाचा अनुभव परखड वक्ता स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षित उमेदवार म्हणून अशोक मानकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या लोणावळा शहरात होताना दिसत आहे
नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (एससी) संवर्गासाठी राखीव झाला असल्याने स्थानिक राजकारणात मोठी हालचालींना वेग आला आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने अनेक इच्छुकांची नावे सध्या समोर येण्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये लोणावळा येथील चर्मकार समाजाचे संयमी अनुभवी नेतृत्व म्हणून श्री.अशोक हरीभाऊ मानकर यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे
मानकर यांनी यापूर्वी समाजातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले असुन आळंदी येथे समाजबांधवासाठी धर्मशाळा बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा असुन सध्या कामशेत श्री संत रोहिदास महाराज भवन उभारण्याचे काम त्यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर सुरू आहे यासह शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते असून, मानकर यांना उत्तम प्रशासकीय दांगट अनुभव अनेक सामाजिक संस्थावर लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा प्रदीर्घ कामाला अनुभव त्यांना आहे मानकर यांना अनेक वेळा शासकीय पदापासून डावल्यानंतर देखील ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहीली आहे ३० वर्षांनंतर लोणावळा नगराध्यक्षपद राखीव झाले असल्याने यामाध्यमातून तरी त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने होत आहे
“लोणावळा शहराच्या विकासाची उंची वाढवण्यासाठी सुशिक्षित, प्रामाणिक आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे अशाच उमेदवारांकडून लोणावळ्याचा विकास होईल,” अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणूक तारीख जवळ येईपर्यंत अनेक डावपेच आखले जाणार असुन अद्यापही पुढे नवीन नावे चर्चेत येणार असून यंदा मात्र या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रंगतदार शर्यत पाहायला मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत.



