राजकीय

“मावळच्या विकासकामांना मोठी गती; आमदार सुनील शेळके यांची PMRDA आयुक्तांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक”

.

Spread the love

पुणे- मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित व आगामी विकास प्रकल्पांना वेग देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त मा. श्री. योगेश म्हसे यांची आज विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत मावळातील मंजूर, निविदा प्रक्रियेत असलेली आणि पावसामुळे ठप्प झालेली अनेक महत्त्वाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली.

बैठकीत सर्व प्रलंबित कामांना त्वरित सुरुवात करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेषतः देहू ते येलवाडी रस्त्याचे काम विलंब न लावता सुरू करणे, परंडवाल चौक–देहू–तळवडे रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, तसेच पावसाळ्यात थांबलेल्या विविध रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले.

यासोबतच पुणे–मुंबई महामार्गावरील मुख्य रहदारीतील महत्त्वाच्या चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याबाबत तसेच गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणा कामांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली.

इंद्रायणी व पवना नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबतही गंभीर चर्चा झाली. नदी प्रदूषण नियंत्रणासाठी PMRDAमार्फत तातडीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे ठोस संकेत या बैठकीत देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस आयुक्त श्री. योगेश म्हसे यांच्यासह PMRDA बांधकाम विभाग व विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मावळ तालुक्यातील सर्व विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मावळच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा देणारी ही बैठक ठरणार असून, नागरिकांच्या अपेक्षांप्रमाणे दर्जेदार व वेळेवर विकासकामे पूर्ण होतील, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त करण्यात केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button