“संघर्षातून उभा राहिलेला ब्रँड! २० वर्षांच्या वाटचालीत ‘शिवराज मुव्हीज’ ते ‘शिवराज ग्रुप’ बनवणारे दत्तात्रय म्हाळस्कर — पडद्यामागचा खरा हिरो!”

मावळ — यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नेहमीच मोठे संसाधन, मोठी ओळख किंवा मोठे पाठबळ लागत नाही; गरज असते ती दृढ इच्छाशक्ती, निरंतर प्रयत्न आणि अपार मेहनतीची. आणि हे सर्व एकवटले की साधा माणूसही ‘हिरो’ बनतो. आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात फोटोग्राफी व इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात वेगाने उंच भरारी घेत असलेले ‘शिवराज मुव्हीज’ याचे सर्वेसर्वा दत्तात्रय म्हाळस्कर हे त्याच संघर्षातून घडलेले खरे कलाकार.
मावळ तालुक्यातील वडगाव मधील दत्तात्रय म्हाळस्कर यांनी फोटोग्राफी व्यवसायाची पहिली पायरी चढली तीही अत्यंत कठीण परिस्थितीत. हातात कॅमेरा नव्हता; पण डोळ्यात स्वप्नांची चमक मात्र प्रखर होती. पाहुण्यांकडून, मित्रांकडून, जमेल त्यांच्याकडून जमा केलेले काही पैसे… आणि त्यातून घेतलेला पहिला कॅमेरा MD9000! त्या कॅमेऱ्याने काढलेला पहिला फोटो आजही त्यांच्या आयुष्यातील सर्वात अनमोल आठवण आहे. हाच क्षण या व्यवसायाचा ‘शुभारंभ’ ठरला.
याआधी म्हाळसकर यांनी अनेक कामे अनुभवली — कधी लोकांच्या दारोदारी दूध पोचवले, तर कधी पुण्यासारख्या गर्दीच्या बाजारात उभे राहून रोपे विकली. पिठाची गिरणी चालवली, पेप्सीचा व्यवसाय केला, अगदी कंपनीमध्येही काम केले. जीवनाने प्रत्येक टप्प्यावर नवी कसोटी दिली, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या प्रत्येक संघर्षाने त्यांना पुढील उंच भरारीसाठी तयार केले.
फोटोग्राफीच्या क्षेत्रात प्रवेश करताच त्यांनी केवळ फोटो क्लिक करायचे नाहीत, तर क्षण जिवंत ठेवायचे — ही भूमिका स्वीकारली. आज तीच दृष्टी ‘शिवराज मुव्हीज’ची सर्वात मोठी ताकद ठरली आहे.
आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटिक शूट, इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल मीडिया प्रमोशन या सर्वांचे एकमेव, अत्याधुनिक आणि विश्वासार्ह ठिकाण म्हणून ‘शिवराज मुव्हीज’ ओळखला जात आहे.
इतकेच नव्हे तर मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिवराज मुव्हीजची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची ओळख बनली आहे.
विशेष म्हणजे, निवडणूक काळात आमदार सुनील शेळके यांच्या सोशल मीडिया टीमची जबाबदारीही शिवराज मुव्हीजकडेच होती, आणि त्यांनी ती अत्यंत कौशल्याने, नियोजनबद्ध पद्धतीने व अचूकतेने पार पाडली. यातून त्यांच्या टीमचे कामकाज, गुणवत्ता आणि वेळेचे भान याची पुष्टी झाली.
• दत्तात्रय म्हाळस्कर केवळ फोटोग्राफर नाहीत; ते स्वप्ने रंगवणारे कलाकार आहेत.
सुखद क्षण, वाढदिवस, लग्नसोहळे, राजकीय कार्यक्रम, निवडणुकीतील तीव्र धावपळ—या प्रत्येक क्षणाला ते आपल्या कॅमेऱ्यात इतक्या अचूकतेने पकडतात की ते क्षण कायमचे स्मरणात राहतात.
आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवराज मुव्हीज हे केवळ नाव नसून एक ब्रँड बनले आहे. रोजगार निर्माण, तरुणांना प्रशिक्षण, नवीन संकल्पना, अत्याधुनिक तंत्रज्ञान — यामुळे ‘शिवराज मुव्हीज’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करणार आहे.
🔷 व्यवसायाचा विस्तार — ‘शिवराज ग्रुप’ची उभारणी
२० वर्षांत आज हा व्यवसाय फक्त ‘मुव्हीज’वर थांबला नाही. दत्तात्रय म्हाळकर यांनी धाडस, दृष्टी आणि नियोजन यांच्या जोरावर व्यवसायाचे अनेक नवे उपक्रम सुरू केले —
1️⃣ शिवराज ब्रॉडबँड इंटरनेट सेवा
उच्च दर्जाचे, स्थिर आणि जलद इंटरनेट देणारी ही सेवा आज ग्रामीण भागासाठी मोठा आधार ठरत आहे.
2️⃣ डिश टीव्ही एजन्सी
ग्राहकसेवा, उपलब्धता आणि विश्वासार्हतेमुळे या एजन्सीनेही वेगाने वाढ साधली आहे.
3️⃣ शिवराज रिसॉर्ट
प्राकृतिक सौंदर्य, शांत वातावरण आणि दर्जेदार सेवा यामुळे हे रिसॉर्ट लवकरच पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय होत आहे.
“गेल्या २० वर्षांत छोट्याशा कॅमेऱ्यापासून सुरू केलेला प्रवास आज इतका मोठा झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पत्नीची मिळालेली साथ, ग्राहकांचा विश्वास आणि टीमची मेहनत हीच आमची खरी ताकद आहे. शिवराज मुव्हीज, शिवराज ब्रॉडबँड व रिसॉर्ट या सर्व उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. पुढे आणखी उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
– दत्तात्रय चिमाजी म्हाळसकर शिवराज मुव्हीज सर्वेसर्वा