राजकीय

नवलाख उंब्रे ठाकर वस्तीला सन्मानाची भेट; महिलांसाठी मोफत शौचालय उभारून दिलेला सुरक्षिततेचा आधार

दिलेला शब्द कृतीत उतरवणारे हक्काचे नेतृत्व – मेघाताई प्रशांतदादा भागवत

Spread the love

नवलाख उंब्रे – येथील ठाकर वस्ती रामवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत येथे सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्यासमोर वस्तीतील महिला भगिनींनी अत्यंत जिव्हाळ्याची व गंभीर समस्या मांडली—वस्तीत शौचालयांचा अभाव आणि बंद पडलेल्या शौचालयांमुळे होणारी दैनंदिन कुचंबणा. “आमच्या वस्तीत शौचालय बांधून द्या,” ही थेट मागणी ऐकताच मेघाताईंनी विलंब न करता प्रशांतदादा भागवत यांच्याशी चर्चा करून दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

ठाकर वस्तीतील नागरिक पडक्या घरांत राहणारे, शेळ्या–मेंढ्यांवर उपजीविका करणारे; वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला समाज. अशा परिस्थितीत सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क जपण्याच्या भावनेतून मेघाताई व प्रशांतदादा भागवत यांनी अत्यंत दर्जेदार, स्वच्छ व मजबूत मोफत शौचालये उभारून दिली. काम पूर्ण होताच वस्तीतील महिलांमध्ये आनंद, समाधान आणि सुरक्षिततेची भावना स्पष्टपणे जाणवू लागली. महिलांचे आरोग्य, सुरक्षितता व सन्मान या तिन्ही मुद्द्यांवर ठोस उपाय केल्याने मेघाताईंच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रसंगी नवनाथ पडवळ, तानाजी पडवळ, अंतुभाऊ शेटे, नवनाथ सांवत, मच्छिंद्र शेटे, बाळासाहेब पारधी, संजय जगनाडे, मोहिनी ताई कलावडे, शोभा ताई शिर्के, स्वाती ताई पापल, पूनम ताई पडवळ, सुमन ताई शिर्के, आनंदीबाई वाळुंज, शिल्पा ताई विक्रम कदम, पूनम तानाजी पडवळ, कल्पना जाधव, अल्काबाई कार्ले, शुभांगी कदम, सुरेखा जाधव, मनीषा खंडागळे, सविता मेंगळे, कल्पना मेंगळे, बाबाबाई जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणतेही अधिकृत पद नसतानाही “दिलेला शब्द पूर्ण करणारे नेतृत्व” म्हणून मेघाताई प्रशांतदादा भागवत यांची ओळख संपूर्ण तालुक्यात बळकट होत आहे. महिलांशी व ज्येष्ठांशी थेट संवाद, तळागाळातील प्रश्नांची अचूक जाण आणि तात्काळ निर्णयक्षम कार्यशैली—या गुणांमुळेच त्या वराळे–इंदोरी गटातील प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. ठाकर वस्तीतील शौचालय उभारणीसारखी मोठी समस्या सोडवून त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी या गटात मेघाताई भागवत यांचीच निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button