पिंपरी चिंचवडमावळराजकीय

टाकवे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तानाजी असवले असवले, उपाध्यक्षपदी डॉ.बंडु पवार यांची निवड

Spread the love

 

टाकवे बुद्रुक– टाकवे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तानाजी असवले व उपाध्यक्षपदी बंडू पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामपातळीवर शिक्षणाच्या गुणवत्तेच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प नव्याने निवड झालेल्या समिती सदस्यांनी व्यक्त केला.

टाकवे जिल्हा परिषद शाळेत झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच अविनाश असवले, माजी शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, माजी उपसरपंच परशुराम मालपोटे,माजी उपसरपंच प्रतिक्षा जाधव,संतोष होले ,बाबुशेठ ओसवाल,दिलीप आंबेकर, अविनाश गुणाट, नवनाथ आंबेकर,दिपक शिंदे, तानाजी असवले,नवनाथ गुणाट, विलास साबळे, अविनाश जगताप मुख्याध्यापक मारुती लायगुडे उपशिक्षक अतुल गायकवाड तसेच पालक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि शाळेच्या पुढील विकास आराखड्यावर चर्चा झाली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुवर्णा असवले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शाळेतील भौतिक सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करणे, तसेच शालेय उपक्रमांना गती देणे यावर त्या भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष बंडु पवार यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पालक-शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले. स्थानिक ग्रामपंचायत आणि पालकांचा सहकार्य मिळाल्यास शाळेचा विकास अधिक वेगाने साधता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button