निधन वार्ता
टाकवे येथील आदर्श माता स्व.श्रीमती रखमाबाई रघुनाथ असवले यांचे निधन
बधुवारी दि ५.११.२०२५ रोजी दशक्रिया विधी

टाकवे (ता. मावळ) : येथील आदर्श माता श्रीमती रखमाबाई रघुनाथ असवले (वय ८५) यांचे दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सहा मुली सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असुन हभप.देवाराम महाराज असवले, गुणवंत कामगार बळीराम असवले यांच्या मातोश्री होत्या
दशक्रिया विधी बुधवार दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ९ वाजता टाकवे बुद्रुक नवीन स्मशानभूमी येथे पडणार असून, ह.भ.प. सौ. अलकाताई सतिश वाल्हेकर (नसरापूर) यांची प्रवचनरुपी सेवा होणार आहे
समस्त असवले परिवार व सगेसोयरे, तसेच ग्रामस्थ टाकवे बुद्रुक यासकडुन उपस्थितीची नम्र विनंती केली आहे.



