मावळराजकीय

मावळ तालुक्यात लवकरच बड्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये होणार जाहीर पक्ष प्रवेश 

मुंबई मध्ये होणार पक्ष प्रवेश कार्यक्रम

Spread the love

मावळ तालुक्यात लवकरच बड्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये होणार जाहीर पक्ष प्रवेश 

वडगाव मावळ – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या काही नेते मंडळीचा भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या मावळ तालुक्यात जोरदार सुरू आहे याबाबत सध्या बैठकांचा जोर सुरू असुन सोमवारी याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे काही नेत्यांनी खाजगीत सांगितले जात आहे यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,मावळ पंचायत समिती , लोणावळा नगरपरिषद, तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये मावळ भाजपला किती फायदा होणार हे या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच मात्र स्पष्ट होऊ शकते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button