बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूलचा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व दिनदर्शिका प्रकाशन’ सोहळा मंगळवारी

मावळ (टाकवे बुद्रुक) – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मा. असवले इंग्लिश मीडियम हायस्कूल (टाकवे बुद्रुक) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ आणि ‘नूतन वर्ष २०२६ दिनदर्शिका प्रकाशन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता शाळेच्या प्रांगणात (सरकारी हॉस्पिटल समोर, घोणशेत/कचरेवाडी रोड, टाकवे) येथे पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच सिद्धिविनायक प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मा. श्री. गणेशभाऊ काकडे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी व सरपंच परिषद मावळचे अध्यक्ष मा. श्री. सुनील (नाना) भोंगाडे आणि पिंपरी-चिंचवड येथील अधिराज प्रॉपर्टीजचे उद्योजक मा. श्री. संदिपशेठ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी असवले, उपाध्यक्ष श्री. मनोज जैन, सचिव श्री. रामदास वाडेकर, खजिनदार श्री. तानाजी असवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे संचालक मंडळ—श्री. भूषण असवले, श्री. पांडुरंग मोडवे, श्री. राजू खांडभोर, श्री. आतिष परदेशी, श्री. स्वामी जगताप, श्री. सोमनाथ असवले, श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. रामदास कोद्रे, श्री. लक्ष्मण कुटे, श्री. राजेंद्र कालेकर—आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. राज कांबळे व उपमुख्याध्यापिका सौ. प्रियांका कुडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. तरी या नयनरम्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी असवले यांनी केले आहे.



