राष्ट्रीय

मावळात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” दौरा

टाकवे बु., फळणे, बेलज परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्वरित कार्यवाहीचे आश्वासन

Spread the love

टाकवे बु. : मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या “जनसंवाद” अभियानाचा पुढचा टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वीज समस्यांबाबत तक्रारी, रेशनकार्ड गैरसोयी, एस.टी. बसची अनियमितता, पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी यांसारख्या विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. कचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी महसूल, पंचायत समिती, विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वनविभाग आदींचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांशी चर्चा करून त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

“जनसंवाद हा फक्त संवाद नव्हे तर लोकांच्या भावना समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा खरा प्रयत्न आहे,” असे सांगून त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

हा दौरा केवळ राजकीय उपक्रम न राहता नागरिकांच्या समस्या सोडविणे व विकासाच्या गतीस चालना देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button