मावळपिंपरी चिंचवड

पीसीसीओई काॅलेजच्या विद्यार्थ्यांची सहारा वृध्दाश्रमास भेट

विद्यार्थ्यांनी साधला वयोवृद्ध आजी आजोबांसोबत मनमोकळा संवाद

Spread the love

 

मावळ – आकुर्डी येथील पीसीसीओई, इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आज सहारा वृध्दाश्रमास भेट दिली.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमा अंतर्गत येणाऱ्या “समुदाय सहभागिता प्रकल्प” या अंतर्गत ही भेट होती. मावळ तालुक्यातील कुसवली या आदिवासी गावात असलेल्या या आश्रमातील रस्त्यावर सापडलेल्या निराधार चौदा आजी आजोबांना भेटून त्यांना आनंद झाला. त्यांचं आश्रमातील जगणं, कुटूंब असतानाही मुलगा, सून यांनी घरातून हाकलून दिल्यानंतर त्यांच्या जगण्याचा संघर्ष ऐकला व जिवंत राहण्याचा संघर्ष मुलांनी अनुभवला.
आश्रमातील पिठलं-भाकरी या जेवणाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. काॅलेजच्या प्रा. वर्षा बेंद्रे यांनी या सहलीचे नेतृत्व केले होते. आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी आभार मानले. सायंकाळी आश्रमातून बाहेर पडताना सर्वच जण भावूक झाल्याचं दृश्य यावेळी पहावयास मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button