मावळराष्ट्रीय

टाकवेतील एकविरा हॉस्पिटल आता अत्याधुनिक सेवांसह रुग्णांच्या सेवेत

आय सी यु सह सर्व वैद्यकीय सुविधा देणार आंदर मावळातील एकमेव हॉस्पिटल

Spread the love
  •    टाकवे बुद्रुक (ता. मावळ) – आंदर मावळ परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेत मोलाची कामगिरी करत विश्वासाचे प्रतीक ठरलेले एकविरा हॉस्पिटल, टाकवे आता अत्याधुनिक सुविधा, नव्या तंत्रज्ञानासह आणि वाढीव सेवा क्षमतेसह रुग्णांच्या सेवेत सज्ज झाले आहे. ग्रामीण भागात दर्जेदार उपचार, तज्ञ डॉक्टर्स, व्यवस्थित वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि किफायतशीर खर्च या संकल्पनेवर आधारित असलेले हे हॉस्पिटल आता अधिक सक्षम झाले असून रुग्णांना सर्व उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

• १५ बेड क्षमतेचे सुसज्ज रुग्णालय

एकविरा हॉस्पिटलमध्ये एकूण १५ बेडची सुविधा असून त्यामध्ये रुग्णांच्या सर्व गरजांना अनुरूप रचना करण्यात आली आहे.

५ बेड आयसीयू (गंभीर रुग्णांसाठी)

२ बेड डिलक्स रूम (खासगी, आरामदायी सुविधा)

३ बेड पुरुष जनरल वॉर्ड

३ बेड महिला जनरल वॉर्ड

१ बेड प्रसूतीसाठी (प्रसूती कक्षाशी संलग्न)

१ बेड अतिआवश्यक रुग्णासाठी

याशिवाय हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र लेबर रूम, अत्यंत स्वच्छ आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सेंट्रल ऑक्सिजन प्रणाली, एक्स-रे सुविधा, मेडिकल स्टोअर, तसेच लॅब सेवा या सुविधा उपलब्ध आहेत.

• कॅशलेस इन्शुरन्स सुविधा उपलब्ध

ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय खर्चाचा ताण येऊ नये यासाठी एकविरा हॉस्पिटलमध्ये विविध इन्शुरन्स कंपन्यांसोबत करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रुग्णांना कॅशलेस उपचार सुलभरीत्या मिळू शकतात.

कॅशलेस टायअप असलेल्या कंपन्या:

HDFC ERGO,आदित्य बिर्ला,MD India,Ericson

तर कॅशलेस Anywhere सुविधा असलेल्या कंपन्या:

1. Star

2. ICICI Lombard

3. Mediassist

4. Bajaj Allianz

म्हणजे या कंपन्यांमधील विमा असलेल्या रुग्णांना देखील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस पद्धतीने भरती व उपचार करता येतील.

सर्वसामान्यांपासून गंभीर आजारांपर्यंत उपचार

एकविरा हॉस्पिटलमध्ये खालीलप्रमाणे विविध आजारांवर तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात:

टायफॉईड, मलेरिया, डेंगू, जुलाब-उलट्या, मुतखडा, श्वसनास त्रास, दमा व फुफ्फुसांचे आजार, मेंदूचे विकार, मणक्याचे विकार, उच्च व कमी रक्तदाब, अपघातग्रस्त आणि टाके टाकणे, पोटाचे आजार, पॅरॅलिसिस, त्वचेचे आजार, हृदयविकाराचा झटका, महिलांचे आजार आणि गर्भावस्थेतील उपचार, प्रसूती, लहान मुलांचे आजार, कान-नाक-घसा विकार तसेच कीटकनाशक OPP विषबाधा उपचार इ.

विविध शस्त्रक्रियाही यशस्वीपणे

हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स, मुतखडा, सिजेरियन (प्रसूती), हर्निया, सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरचे ऑपरेशन, शरीरावरील गाठी काढणे, केश रोपण (Hair Transplant), मूळव्याध (Piles), कान-नाक-घसा शस्त्रक्रिया तसेच नॉर्मल डिलिव्हरी या शस्त्रक्रिया अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात.

डॉ. सुनिल शंकर औटी यांनी सांगितले की,“आंदर मावळातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा हाच आमचा उद्देश आहे. शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन होणारा त्रास आणि जादा खर्च यापासून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही अत्याधुनिक सुविधा येथेच उपलब्ध केल्या आहेत. रुग्णांची काळजी, सुसूत्र उपचार आणि किफायतशीर दर ही आमची खरी ओळख आहे.”

• लवकरच ऍम्ब्युलन्स सेवा सुरू

सध्या परिसरात तातडीच्या वेळी ऍम्ब्युलन्सची कमतरता जाणवत असल्याने हॉस्पिटल व्यवस्थापनाने लवकरच किफायतशीर दरात ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः कान्हे फाटा ते खांडी या मोठ्या क्षेत्रातील नागरिकांना याचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे.

संपर्क:डॉ. शितल सुनिल औटी – 9307866276,डॉ. सुनिल शंकर औटी – 9769447714

एकविरा हॉस्पिटल – टाकवे- विश्वासाची ओळख, उत्तम आरोग्याची हमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button