
टाकवे बुद्रुक – ग्रुप ग्रामपंचायत टाकवेच्या उपसरपंचपदी बेलज येथील सदस्या आशा मदगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळत्या उपसरपंच प्रिया मालपोटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली
सरपंच अविनाश असवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने आशा मदगे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब मतकर यांनी जाहीर केले
यावेळी सरपंच अविनाश असवले ,माजी सरपंच भुषण असवले माजी उपसरपंच परशुराम मालपोटे,मा.सरपंच सुवर्णा असवले,मा.उपसरपंच प्रतिक्षा जाधव, संध्या असवले,ज्योती आंबेकर उपस्थितीत होत्या.
ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असुन आदीवासी बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच आशा मदगे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.



