आंदोलन

मावळ तालुक्यातील शासकीय कामकाजावर परिणाम; कर्मचारी संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

Spread the love

वडगाव मावळ  —  मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनाचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार आज, सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात वडगाव मावळ येथील महसूल मधील विविध कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, त्याचा थेट परिणाम शासकीय कामकाजावर होत आहे. सामूहिक रजा आंदोलनामुळे संबंधित कार्यालयांचे कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यात तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button