🩸 रक्तदान व आरोग्य शिबिराचे टाकवे बुद्रुक येथे आयोजन; धो. य. खांडभोर (गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
पवार हॉस्पिटल आणि लाईफलाईन ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कार्यक्रमाचे आयोजन.

टाकवे बुद्रुक:-समाजातील आरोग्याच्या गरजा ओळखून आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून, धो. य. खांडभोर (गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्ट, पवार हॉस्पिटल आणि लाईफलाईन ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘रक्तदान शिबिर’ आणि ‘एचआयव्ही टेस्ट’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. टाकवे बुद्रुक येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या पवार हॉस्पिटल मध्ये या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
धो. य. खांडभोर (गुरुजी) यांच्या पावन स्मृतीस उजाळा देत, एका उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. या शिबिरात रक्तदानासोबतच नागरिकांसाठी एचआयव्ही चाचणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे आरोग्याविषयी जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
तरी परिसरातील जास्तीत जास्त तरुण, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या ईश्वरी कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
* दिनांक: रविवार, १४ डिसेंबर २०२५
* वेळ: सकाळी ९:०० ते सायं. ४:०० वा.
* स्थळ: पवार हॉस्पिटल, गणपती मंदिराच्या शेजारी, टाकवे बुद्रुक.अधिक माहितीसाठी डॉ.पवार ( पवार हॉस्पिटल) 8625083947 या नंबर संपर्क साधावा.



