मावळ

ब्राह्मणवाडीत (बऊर) येथे श्री संत निळोबाराय गाथा पारायण व कीर्तन ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन

Spread the love

 मावळ : श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पवित्र स्मृतीनिमित्त ब्राह्मणवाडी (बऊर), ता. मावळ, जि. पुणे येथे श्री संत निळोबाराय गाथा पारायण व कीर्तन ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा आध्यात्मिक सोहळा शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ ते मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार असून परिसरातील वारकरी, भाविक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सोहळ्यात दररोज पहाटे काकडा आरती व भजन, सकाळी आणि दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ व सायं. ७ ते ८ या वेळेत कीर्तनसेवा आणि रात्री हरिजागर आयोजित करण्यात आला आहे. गाथा पारायण व व्यासपीठ संचालनाची जबाबदारी भागवताचार्य ह.भ.प. यतिराज महाराज लोहार (आळंदी) यांच्याकडे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे.

सोहळ्यादरम्यान विविध मान्यवर कीर्तनकार आपली कीर्तनसेवा सादर करणार आहेत. यामध्ये शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी ह.भ.प. यतिराज महाराज लोहार, शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. वैभव महाराज राखे (देहू), रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. चक्रेश्वर महाराज पाटकर आणि सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गंगामुनी महाराज पाटोळे हे कीर्तनसेवा सादर करणार आहेत. तसेच मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (गोसावी समाज, डोंगर) यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्याचा समारोप मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत दिंडी प्रदक्षिणेने होणार आहे. या ज्ञानयज्ञ सोहळ्यास पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ तसेच मुळशी परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जागर करणारा ठरणार असून, ग्रामस्थ मंडळींनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कीर्तन, गाथा पारायण व नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button