मावळ

शिवजयंतीनिमित्त टाकवे बुद्रुक येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन; १२३ बैलगाड्यांचा सहभाग

शिवजयंतीनिमित्त बाळराजे मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

Spread the love

टाकवे बुद्रुक : शिवजयंती उत्सवानिमित्त बाळराजे मित्र मंडळ यांच्या वतीने यंदा प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या पारंपरिक आणि रोमांचक स्पर्धेत तब्बल १२३ नामांकित बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला आहे. या शर्यतीमुळे परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून टाकवे येथील बैलगाडा घाटात शर्यतींना प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी लोहगड किल्ला येथून शिवज्योत प्रज्वलित करून ती टाकवे गावात आणण्यात येणार असून गावकऱ्यांकडून या ज्योतीचे पारंपरिक व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात येईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विधिवत पूजा व आरती करून बैलगाडा शर्यतीस अधिकृत सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या भव्य स्पर्धेसाठी आकर्षक व मोठ्या प्रमाणात बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याने सांगण्यात आले आहे 

शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे पारंपरिक ग्रामीण क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून टाकवे बुद्रुक परिसरात उत्सवाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button