निधन वार्ता

मावळ तालुक्यातील साते येथील माजी सैनिक कै. झुंबर नामदेव उभे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; स्मृतिप्रित्यर्थ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

.

Spread the love

मावळ : मावळ तालुक्यातील साते येथील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक कै. झुंबर नामदेव उभे (वय ८५) यांचे सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साते परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

देशसेवेचे व्रत निष्ठेने पार पाडणारे कै. उभे यांनी आयुष्यभर शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना जपली. समाजातील प्रत्येक घटकाशी आत्मीयतेने वागणारे, शांत व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवार दि. ०४ मार्च २०२६ ते मंगळवार दि १० मार्च २०२६ या कालावधीत सायं. ६.३० ते ७.३० या वेळेत राहत्या घरी दैनिक ‘गरुडपुराण’ वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सायं. ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प. चेतन महाराज सातकर (कान्हे) यांचे प्रवचन व सेवा होणार आहे.

शोकाकुल परिवारामध्ये

श्री. नामदेव झुंबर उभे (मुलगा), श्री. सुरेश झुंबर उभे (मुलगा), श्री. बाळासाहेब गावाजी उभे (पुतण्या), श्री. विजय मगन उभे (पुतण्या), श्री. स्वप्नील बाबन उभे (नातू), सौ. मंगल पांडुरंग आगळे (मुलगी), सौ. सुनीता श्रीरंग बालघरे (मुलगी), श्रीमती अनीता गोविंद बालघरे (मुलगी), तसेच श्री. वसंत भाऊ घोंगे यांच्यासह उभे परिवारातील सर्व नातेवाईकांचा समावेश आहे.

कै. झुंबर नामदेव उभे यांच्या जाण्याने उभे परिवाराने आपला कर्तृत्ववान कुटुंबप्रमुख गमावला असून परिसराने एक आदर्श, स्नेही आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button