राजकीयमावळ

तळेगाव दाभाडेची निवडणूक रंगतदार! बिनविरोध १९ नगरसेवकांनी केला ‘क्लीन स्वीप’, तर नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी महामुकाबला — ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात

Spread the love

 

तळेगाव दाभाडे – जवळपास सात वर्षांनंतर होत असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीने राजकीय रंगत चांगलीच चढली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा दबदबा सुरू असतानाच नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत आणि उर्वरित ९ नगरसेवक पदांसाठी तब्बल २३ उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूकचं समीकरण अधिकच रोचक बनलं आहे.

नगरसेवक पदाच्या २८ पैकी तब्बल १९ जागांवर एकही विरोधक न उभा राहिल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटणं सोपं नसणार आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे, विरोधक किशोर छबुराव भेगडे आणि अॅड. रंजना रघुनाथ भोसले यांच्यात सरळ तिरंगी लढत होणार आहे.

🔹 प्रभागनिहाय चुरशीच्या लढती

प्रभाग २-अ : विना जयंत कामत, ऋतुजा काळोखे, तनुजा दाभाडे, विभावरी दाभाडे — अशी चार महिला उमेदवारांत स्पर्धा

प्रभाग ३-अ : अनिता पवार विरुद्ध विना शिंदे — दुरंगी सामना

प्रभाग ३-ब : सिद्धार्थ दाभाडे विरुद्ध विशाल लोखंडे — चुरस वाढली

प्रभाग ५-अ : भारती धोत्रे विरुद्ध आरती धोत्रे — कौटुंबिक लढत चर्चेत

प्रभाग ७-ब : सूरज कदम विरुद्ध चिराग खांडगे — अटीतटीची लढत

प्रभाग ८-अ : मनिषा म्हाळसकर विरुद्ध स्नेहल म्हाळसकर — महिला शक्ती समोरासमोर

प्रभाग ८-ब : माजी नगरसेवक अमोल शेटे विरुद्ध सुदाम शेळके — राजकीय घराण्यांची प्रतिष्ठेची लढत

प्रभाग १०-अ : पंचरंगी सामना — मजनू नाटेकर, सचिन पवार, अरुण माने, करुणा सरोदे, स्वप्नील निकाळजे

प्रभाग १०-ब : सपना करंडे विरुद्ध संगीता खळदे — सरळ सामना

🔹 महायुती विरुद्ध विरोधक : प्रतिष्ठेची निवडणूक

आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वामुळे तळेगावची निवडणूक अधिकच गाजत आहे. एकीकडे महायुतीने १९ जागा बिनविरोध जिंकत ताकद दाखवली, तर नगराध्यक्ष पद आणि ९ प्रभागातील निवडणुका हा खरा शक्तिपरीक्षेचा क्षण ठरणार आहे.

तळेगाव दाभाडेतील मतदार, कार्यकर्ते आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते ७ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. तिरंगी लढतीमुळे नगराध्यक्ष पदाचा अध्याय कोणाच्या नावावर बंद होणार? २३ उमेदवारांमधून ९ जागांचे विजेते कोण होणार? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button