वैद्यकीय

टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी ‘दृष्टी’लाभाची सुवर्णसंधी! आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २५ डिसेंबरला टाकवे बुद्रुक येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

 डॉ.अशोक दाते यांच्या पुढाकारातून; नेत्रतपासणीसह विविध गंभीर आजारांवर मोफत शस्त्रक्रियेची सुविधा नागरिकांना मिळणार

Spread the love

मावळ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मावळचे लोकप्रिय आमदार श्री. सुनील (अण्णा) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अशोक विठ्ठल दाते (M.B.B.S, M.S.) यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 

सदर शिबिर गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत टाकवे जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात प्रामुख्याने महिला, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे. तसेच, ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे, अशा रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यासह केवळ नेत्रतपासणीच नव्हे, तर ‘स्पर्श हॉस्पिटल’च्या माध्यमातून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध गंभीर आजारांवर मोफत तपासणी आणि उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मणका, मेंदू आणि हाडांचे आजार, मुतखडा (Kidney Stone), स्त्रीरोग व जनरल सर्जरी या आजारांवर मोफत तपासणी करून ठराविक आजारांवर मोफत ऑपरेशनची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

शिबिरात लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण असावे ऑपरेशनसाठी आधारकार्ड आणि रेशनकार्ड सोबत असणे आवश्यक आहे.डोळे तपासणी शिबिर प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी होणार आहे या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन डॉ. अशोक विठ्ठल दाते (संचालक: पार्वती नेत्रालय व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.) टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर अशोक दाते यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button